छोटा गैरसमज

 आज रेवा आणि बाबाला सुट्टी.

आईला आज ऑफिस होतं.

आज स्वयंपाकाच्या मावशींनी सुट्टी घेतली आहे.

आईने सकाळी पटापट जमेल तेवढा स्वयंपाक केला.

मग आईने लॉगिन केलं.

WFH करत असल्यानं आई  "घर की मुर्गी दाल बराबर" आहे रेवासाठी.

बाबा एरवी फक्त शनिवार रविवार वाट्याला येतो.

आज फक्त रेवा आणि बाबा.

आज तर तिच्या साठी तंगडी कबाब फिलिंग आलं असणार. प्रचंड खुष होती.


बाबाने आज रेवाला अंघोळ घातली.( रविवारी बाबा रेवाला अंघोळ घालतोच. आज बोनस दिवस)

दोघांनी मिळून हार आणले,दरवाजाला लावले.

गाड्या धुतल्या, हाराने सजवल्या.

तिची छोटी सायकल रेवाने स्वच्छ केली.सायकल हार घालून नटली.

बाबाने घर आवरले.खास त्याच्या टचने बारीक सारीक, काना कोपऱ्यातून कचरा, धूळ झाडून घेतली.(१००% स्वच्छ)

पूजा वैगरे झाली मग बाबा अजून कामाला लागला.

बाबाला पाहून रेवाने तिची छोटी खुर्ची स्वयंपाघरात घेतली आणि बसून घेतलं.

रेवा बघत होती.


बाबाने डाळ तांदूळ धुवून घेतले.कुकर लावला.

एकीकडे सटर फटर भांडी घासून टाकली.

बाबाने कणकेचे छोटे गोळे केले.

कढई खाली गॅस लावला 

आता रेवाचे सवाल चालू झाले.


"बाबा तू काय करतोयस, आता तेल का ओतलंस , छोटी पोळी का लाटतोयस, त्याचं आता काय करणारेस....."

तिला उत्तर देत बाबाचं पुऱ्या करायचं काम चालू होतं.

इतक्यात तिला माझा एप्रन दिसला.

"बाबा, बॉईज एप्रन नाही घालत. ओन्ली गर्ल्स घालतात."

"नाही रेवा, गर्ल्स अँड बॉईज दोघं घालतात. बॉईज पण कुकिंग करतात"

"तू पण आज करतोय तसेच?"

"हो"


बाबाने नुसता एप्रन घातला नाही तर सणाला करायच्या गोष्टी, साफसफाई, केरवारे, स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी आई बरोबर बाबापण करतो,ह्या सगळ्या गोष्टी गर्ल्स आणि बॉईज दोघांनी करायच्या आहेत न बोलता सांगितलं.


एक छोटा गैरसमज होता होता वाचला.

कृतीतून सांगितल्याने त्याचं महत्त्व जास्त.


हे आजच्या दिवशी झालेलं आमच्या पुरतं सीमोल्लंघन!!

Comments

Popular Posts