तू आई आहेस म्हणुनी

 परवा मी रेवासोबत खेळायला बसले होते.आधी एक एक करून गोष्टीची पुस्तके काढून झाली..त्यातली चित्र बघून फॉक्स ची गोष्ट सांग,हम्माची गोष्ट सांग अशा आदेश वजा सूचना येत होत्या.आपण गोष्ट सांगायला सुरुवात केली..५ वाक्यांनंतर तिचा पेशन्स संपला."आई आता तू मश्रुमखाली राहणाऱ्या बेडकाची(!) ची गोष्ट सांग".असं होत होत पुस्तक संपलं.😅

मग गाण्याचं पुस्तक हातात नाचवत घेऊन आली ."आई तू हे गाणं म्हण".मग "हे" गाणं म्हणून झालं म्हणून आपण पुढचं गाणं म्हणावं म्हटलं तर बाईसाहेब पान उलटून "नट्टापट्टा" गाण्यावर पोहोचलेल्या असतात.ते साभिनय करून झालं की पुढे फर्माईशी नुसार ते ते गाणं आपण म्हणून दाखवाव. मी मध्येच तिला म्हटलं,"रेवा आता तू म्हण गाणं" तर "नाही,तूच म्हण" असं उत्तर येतं.ही मैफल संपली की मग पझल आठवतं.😯

तू हम्माचे तुकडे(!) काढून दे मी हम्मा लावते.असे एक एक करत ती म्हणेल त्या प्राण्यांचे सगळे तुकडे त्या जंजाळातून शोधून द्यायचे.मग ती एक एक प्राणी पूर्ण करणार.मग ते एका ओळीत लावायचे."दोन ओळींमध्ये लाव" म्हटली तर तसेच लावायचे.मग पुन्हा गोष्टीचं पुस्तक आठवतं..मग पुन्हा तेच सगळं.🔁

थोडक्यात तिच्या सोबत खेळताना अक्टिव पार्टीसिपेशन असावं लागतं..(आठवा ॲप्रेझल🤣)

आता मला कंटाळा आलेला असतो.🤨

आता मी बाबाला बोलावते.आता तू नव्या दमाचा खिलाडी म्हणून तिला त्याच्याकडे सोपवते.थोड्या वेळाने डोकावून बघावं तर..🥺

बाबा निवांत बसून मोबाईल/टीवी बघत असतो..आणि ही एक एक पुस्तक चाळत स्वतःलाच गोष्टी सांगत असते.ते झालं की कविता, गाणी स्वतः म्हणते. "बाबा आता आपण पझल करूया". असं म्हटली की मग बाबा म्हणतो "तुझे तुझे तुकडे शोधून लाव.तू आता मोठी झालीस की नाही.!"मग ही निमूटपणे सगळे तुकडे शोधून तिच्या मनाप्रमाणे एका ओळीत लावते.वर "बघ मी तिचं तिचं लावलं पझल"(म्हणजे मी एकटीने सगळं पझल लावलं) म्हणून आनंदाने सांगते.😱

हा दूजाभाव बघून मी तिला कधी म्हणाले की "तू तुझं तुझं पझल कर,खेळ..!" पण नाही.! मग गळेपडू होऊन "आई तूच कर ना" असं लाडिक सांगणार.🥴

हे सगळं मी आईला सांगितलं तर आई म्हणाली,

"आई हक्काची असते.मुलांनाही कळतं कोण जास्त हक्काचं आहे ते. तुझ्याकडे ती हट्ट करते कारण तू जास्त जवळची आहेस."👩‍👧

निसर्गाने आईकडे सोपवलेली जबाबदारी सवयीची होऊन जाते.मुलंही तसंच पुढं रेटतात.🤷🏻‍♀️

आईवेडेपणा करतीये तोवर

तिचं आत्ता माझ्याकडे असणं,मला झुकतं माप देणं मीपण एन्जॉय करते😍(मोस्ट ऑफ द टाइम्स 😜)

Comments

Popular Posts