निरागस


काल रेवाला घेउन क्लिनिक मध्ये गेलो होतो.किरकोळ खोकल्यासाठी.कितीही किरकोळ असला तरी डॉक्टरांचं दर्शन घेतल्याशिवाय तिला बरं वाटत नाही..🙄

बरीच लहान मुलं एकाच ठिकाणी बघून ती खुश झाली. ताई/ दादाला हाय कर, बाळांचे गालगुच्चे घे असं 4/5 जणांशी खेळून झालं.मग आम्हाला येऊन सांगितलं,"त्याचे सगले दात पल्लेत..तो गोल खातो ना.."


आम्ही तिला गोड देताना सांगतो, जास्त गोड, बिस्कीट वैगरे खाल्लं की दात कीडतात.आणि मग पडतात. 

म्हंटल चला आज प्रात्यक्षिक झालं.


मग तिला विचारलं कुठेय तो दादा? 

तर मॅडमनी जेमतेम १ वर्षाच्या बाळाकडे बोट दाखवलं!!

आणि म्हणते,"त्याला एक पण दात नाहीये. सगळे पल्ले.


कसंबसं हसू दाबत तिला सांगितलं,

"अगं ए, ते बेबी आहे.. अजून त्याला दात आले नाहीयेत."


तिला सांगितलेलं ती लक्षात ठेवते आणि ते तिच्या समजे नुसार अप्लाय पण करते.

त्यातून अशी गंमत होते. आपण मोठे होऊन काय गमावलं ते हेच.. निरागसपणा..

Comments

Popular Posts