आमचं वर्क फ्रॉम होम
इतके दिवस मी एकटीच WFH करत होते.त्या 'before corona kill us, we will kill each other' च्या जोक वर आमचं मनसोक्त हसून झालं. पण आता खरंच तो पण WFH च्या सुखात (?) वाटेकरी होणार आहे. 😜
तसं आपण कितीही खादाड असलो तरी हापिसात लोकलज्जेस्तव सांभाळूनच खातो.घरी सुध्दा एकटीसाठी काही करायला तसा कंटाळाच येतो.
पण आता तसं होणार नाही.त्यात आम्ही खाण्याचे शौकीन आणि घरीच.👻
कित्ती काय काय सुचतंय मला.
सर्वात आधी कोणी कुठे बसायचं हे ठरवायला हवं.
आम्ही दोघं उकडण्याच्या बाबतीत दोन ध्रुव असल्याने एकाने पंख्याचा स्पीड वाढवला तर दुसऱ्याला घरात बसल्या बसल्या हिमालयात असल्याचा फील यायला नको अश्या बेताने दोघांची बसायची जागा ठरवायला हवी.
पाणी प्यायची बाटली माठातल्या वाळ्याच्या सुगंधित पाण्याने भरून ठेवायला हवी.💧
एखादा बग बिग फिक्स केल्या नंतर श्रमपरिहार म्हणून खायला फरसाण ,चिवडा,वेफर्स आणून ठेवायला हवं.😋😋
ते खाल्ल्यानंतरचा guilt जाण्यासाठी संत्री,मोसंबी,स्ट्रॉबेरी,चिक्कू अश्या काम करता करता पटकन खाता येणाऱ्या फळांची रसद भरून ठेवायला हवी. 🤓
नेमका कॉल चालू असताना वायफायच्या Rangeने दम तोडताना बघून कोरडा पडलेला घसा ओला करायला सरबत,पन्हे,ज्यूसच्या बाटल्यांनी फ्रिजचं दार भरून ठेवायला हवं. 🍹
डोक्याला फारच शीण झाला तर मेंदू रिफ्रेश करायला बरणीत बदाम,अक्रोड आणि काजू भरून ठेवले पाहिजेत.😂
कामाचा शेवट गोड करायला लाडू,चिक्की,चॉकोलेट आणून ठेवायला हवीत.🤪
कित्ती तयारी करायची आहे!!🏃♀️
कित्ती कामं वाढवली आहेत Corona ने!!😩
न भूतो न भविष्यति अशी ही phase आहे.
आपण आपल्या माणसांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतोय.👨👩👧
ज्या घरासाठी आपण काम,कष्ट करतो त्या घरात आपण जास्त वेळ राहायला लागलोय.🏠
Stay Home. Stay Clean.🏠🙌
आणि
Happy WFH!
Comments
Post a Comment