ऑनलाईन शॉपिंग


ऑनलाईन शॉपिंग म्हणजे माझ्या अत्यंत आवडीचा विषय.नोकरीला लागल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग खऱ्या अर्थाने चालू झालं.😜छान छान कपडे बघत ऑनलाईन विंडो शॉपिंग करायचं. सगळं काही कार्ट मध्ये साठवून ठेवायचं.अजून छान सापडेल असं वाटून चेक आउट पर्यंत जाऊन कॅन्सल करायचं.असं होता होता एका विक पॉइंटला ते विकत घेणं व्हायचं.मग कपडे आले की ट्राय करायचे,बदलायचे,रिटर्न करायचे.क्वचित शॉपिंग नंतर गील्ट आला तर रिटर्न करायचे असे उद्योग चालू असायचे. इतकं, की बाबा चिडवायचे की 'एखादा महिना काही ऑर्डर केलं नाहीस तर जबाँगला चुकल्या चुकल्या सारखं वाटेल'.🤭

लग्न होऊन संसारी झाल्यावर जबाँग वरून गाडी हळू हळू अमेझॉन वर यायला लागली. कप, मग्ज, मेसन-जार, घुरर घुर् दोरीचा चॉपर, डबे अश्या संसारी वस्तूंची खरेदी करायला आता अमेझॉन वर चक्कर मारायला लागले.

मग रेवा झाल्यानंतर फर्स्ट-क्राय नावाच्या ऑनलाईन दुकानात पण जाणं व्हायला लागलं.नव-आई आणि बाळासाठी जे जे काही लागू शकतं ते सगळं तिथे मिळतं.प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्यापेक्षा हेच बरं वाटतं मला.तिचे डायपर, इवले इवले क्यूट कपडे, केसाचे बेल्ट,खेळणी,दुधाच्या बाटल्या,साबण, शाम्पू सगळं काही फर्स्ट-क्राय व्हायला लागलं.

जबाँग पासून चालू झालेला ऑनलाईन प्रवास अमेझॉन, मिंत्रा ते आता फर्स्ट-क्रायपर्यंत आलाय .

अधून मधून मी फर्स्ट क्राय वर चक्कर मारत असते..ऑफर्स असतील तर स्वस्त आणि मस्त(क्यूट) मिळतं.लहान बाळांच्या शॉपिंग वेबसाईट वर मॉडेल्स नसतात. नुसते कपडे बघूनच ऑर्डर करायचं असतं.कपडा घातल्यावर कसा दिसेल ह्याची कल्पना येत नाही.रेवाला समजायला लागल्यापासून तिने पण सांगायला चालू केलं, "आई हे खेळणं घे, आई हा पिंक फ्रॉक घे."

आपण आईला सांगतो आणि काही दिवसांनी एक काका (delivery boy) ती वस्तू आपल्याला आणून देतात हे तिला सरावाने(😉) समजलंय..

तर मी सहज(!) मिंत्रा वर कपडे बघत होते.रेवा पण बघत होती.इथे तिला वेगवेगळे कपडे घातलेल्या मॉडेल्स दिसत होत्या..मग एका मॉडेल वर बोट ठेऊन म्हणाली "आई, ही काकू घे🥴..मी खेलेन तिच्याशी.काकांना आणायला सांग🙄😂".


मी: (अवाक) 😯😯😯

नवरा:(मिश्किल हसत) कर अजून ऑनलाईन शॉपिंग!!😣😝😝😝

Comments

Popular Posts