भांडा -भांड


मी स्वयंपाक घरात काम करत असताना फोडण्या, भाजी फोडणीवर टाकलेला आवाज, भांड्यांचा आवाज ह्या आवाजां- व्यतिरिक्त डबे/डब्या खाली पडण्याचे,आमटी भाताचे डाव, चमचे खाली पडण्याचे,भांडी विसळताना एखादं भांड निसटून सिंक मध्ये पडल्याचे असे अनेक आवाज होत असतात.

आईकडे असताना फ्रिज मधून लिंबू ठेवलेला सट काढताना धारातीर्थी पडलेल्या सटांची संख्या जेव्हा ३ झाली तेव्हा पासून आजतागायत ती बिचारी प्लास्टिक च्या वाटीत लिंबू ठेवते.

महिन्या २ महिन्यातून एखादा कप तर फुटायचाच..

सकाळीच नीट केलेला मिसळणाचा डबा मी भाजी करायला म्हणून हातात घेतला आणि हातातून पडणार असं वाटताना उभा धरल्याने डबा खाली पडला नाही पण मिसळणाचा डबा खरंच मिसळ झाला होता..तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल हे मला आत्ता समजतंय.

हे सगळं माझ्या कडून होतं..म्हणजे मुद्दाम नाही अर्थात पण येन केन प्रकारेण काहीतरी वस्तू पडते/फुटते/ पडून वाकते.. कितीही ठरवलं की नीट हाताळायचं तरी शांत स्वयंपाक करणे काही होत नाही.पण रिफ्लक्स स्ट्राँग असल्याने इतके डबे, ताटल्या पडून पायावर आले नाहीत.. काही पडतंय असं वाटत असताना पाय बाजूला होतोच..🤣🤣

आज माझ्याकडून जड आणि मजबूत चिमटा खाली पडला..म्हणजे तसा तो अनेकदा पडलाय पण ह्यावेळी त्याचे दोन भाग वेगळे झाले.मधला स्क्रू निखळला.. 😱

दोन तुकडे दोन हातात घेऊन नवऱ्याला दाखवले.. 

तसं आता त्याला "हे फुटलं?" ,"हे कसं सांडलं?", ह्याला पोच कसा आला?" असे धक्के बसत नाहीत..😷

पण आज तो पण क्षणभर हबकला.. एवढा मोठा चिमटा त्याचं हे असं कसं झालं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकले.. त्याने तो निघालेला स्क्रू बसवून दिला.चिमटा नीट केला.

अजून काहीच बोलला नाही असं वाटत असताना एक वाक्य कानावर पडलं,

"वो स्त्री है.. वो कुछ भी कर सकती है..!!" 🤫🤫🤫

😰😣😣☹️


Comments

Popular Posts