भाषा

 #भाषा

रेवा सध्या हिंदी, इंग्लिश पण शिकत असल्याने कधी कोणत्या भाषेत तिच्या तोंडातून वाक्य येईल,ते सांगता येत नाही. बाल्कनी तून खाली बघताना मांजर दिसली की "बिल्ली" म्हणून जोरात ओरडते.

आपण हिन्दी बोलायचा मूड आहे असं समजून म्हणावं की,"रेवा, देखो धूप आयी है."

तर ती म्हणणार, "अगं, धूप बाप्पासमोर लावायचा." 😣



शाळेत रोज काय शिकवलं ते शाळेच्या

ग्रुप मध्ये बघून मी रेवाला विचारात असते.

अजून तिला इंग्लिश पूर्ण समजत नसल्याने शाळेत शिकवलेल्या up- down, big-small, heavy-light अश्या कन्सेप्ट तिला मराठीतून समजावून सांगते.

Heavy म्हणजे जड आणि Light म्हणजे हलकं असं तिला सांगितल्यावर 

ती म्हणाली, "ट्युब मधून लाईट येतो आणि हलका असल्याने आपल्या अंगावर पडतो.."

हे ती इतक्या कनविंसिंगलि म्हणाली की क्षणभर मला पण वाटलं असंच असावं..😂😂



"आई मला कॅट हवीय"

कपाटाकडे बोट दाखवून रेवा म्हणाली.

"मला कॅट शी खेळायचा.."

मी पूर्ण कन्फ्युज झाले होते.मला अजून समजलं नसल्यानं ती म्हणाली,

"अग तू आणि बाबा खेळत होतात ना त्या कॅट शी खेळायचा.."

.

.

.

.

.

.

.

.

.

मग मी तिला कपाटातून UNO चा cat काढून दिला 😂😂😂😂

Comments

Popular Posts