कच्चिया ते रखिया ना उम्मीद पार दी
यूट्यूब च्या 'Autoplay" या फीचर मुळे गवसलेलं एक सुंदर गाणं : पाकिस्तान कोक स्टुडिओचं "पार चना दे" हे पंजाबी गाणं. एक पंजाबी लोककथा आहे.लैला मजनू,रोमिओ ज्युलिएट यांच्या शोकांतिके सारखी सोह्नी-महिवाल ची एक शोकांतिका.
चिनाब नदीच्या काठावर एक कुंभार रहात असतो.त्याच्या सुबक मडक्यांची ख्याती सर्वदूर पसरली असते.
इज्जत बेग नावाचा एक श्रीमंत व्यापारी ह्या कुंभाराकडे येतो. सोह्नी ह्या कुंभाराची मुलगी. तो बघताक्षणी तिच्या प्रेमात पडतो . काही ना काही कारण काढून मडकी घ्यायला ह्या कुंभाराकडे येत राहतो.
मडकी विकत घेऊ लागतो. सतत मडकी विकत घेण्यामुळे तो कफल्लक होतो.
मग कुंभार त्याला आपल्याकडे म्हशी हाकायला ठेऊन घेतो.
आणि त्याच नाव महिवाल -म्हशी हाकणारा असं पडतं.एव्हाना सततच्या सहवासाने सोह्नी सुद्धा महिवालच्या प्रेमात पडते.त्यांच्यातलं प्रेम बहरायला लागतं. कुंभाराला आपली मुलगी कफल्लक महिवालच्या प्रेमात पडली हे रुचत नाही.
तिचं लग्न दुसऱ्या श्रीमंत कुंभाराशी लावून देतो. विरह असह्य होऊन महिवाल कुंभाराचं घर सोडतो. नदीच्या दुसऱ्या काठावर झोपडीत राहू लागतो.
सोह्नीच्या नवऱ्याला व्यापारानिमित्त बाहेर जावं लागलं की भाजलेल्या मडक्यात बसून ती तीरापल्याड असलेल्या महिवालला भेटायला जाऊ लागते.पहाट व्हायच्या आत परत यायला लागते. एकदा तिची जाऊ झाडात लपवलेलं मडकं पाहते .आणि भाजलेल्या मडक्याच्या जागी ती कच्चं, न भाजलेलं मडकं ठेवते.
चिनाब नदीला भयंकर पूर आलेला असतो.पण तिला महिवालला भेटायला जायचंच असतं.ती मडक्यात बसून नदी पार करायला लागते.थोडं अंतर गेल्यावर मडकं पाण्यात विरघळायला लागतं .पण तिला महिवाल ला भेटायचं आहे. जिवंत ती वा मेलेलं शव तिला महिवाल पर्यंत पोहोचायचं आहे. तिला बुडताना पाहून तोही पाण्यात उडी मारतो. त्या पुरात दोघे मृत्यूने एकत्र येतात.
तर कच्च मडकं आणि सोह्नी ह्यांच्यातील संवाद म्हणजे 'पार चना दे'.ह्यावर कोणाला गाणं सुचू शकतं हेच किती कमाल आहे.मडकं तिला सांगतंय की मी अजून कच्च मडकं आहे, बाहेर नदीच्या पूरात,उसळणाऱ्या लाटांमध्ये माझा टिकाव लागणार नाही..आपण हि नदी पार करू शकणार.पण ती सोह्नी प्रेमवेडी झालेली आहे.महिवालला भेटण्यासाठी वाट्टेल तो धोका पत्करायला तयार आहे.आपण जाऊच.काही झालं तर माझं प्रेत तरी त्याला मिळूदेत म्हणून ती अडून बसली आहे.
अर्थ कळल्यानंतर गाणं भिडत जातं.त्यातले वेगवेगळे अर्थ उलगडत जातात.
अली हमजाने म्हटलेली 'कच्चिया ते रखिया ना उम्मीद पार दी' हि ओळ ऐकताना अंगावर काटा येतो.
'कच्चिया ते रखिया ना उम्मीद पार दी' हि ओळ सध्या माणूस विसरत चाललेल्या शहाणपणाचं सार आहे. सध्या बाहेर कोरोना थैमान घालतोय.जगभरात लाटांवर लाटा येत आहेत.आपली तयारी कच्ची आहे.आरोग्यव्यवस्था तोकडी आहे.शहाणपणा ह्यातच आहे कि घरी थांबणे.स्वयंशिस्त पाळणे.'कच्चिया ते रखिया ना उम्मीद पार दी'.सध्या आपण मडक्याप्रमाणेच असहाय्य आहोत. घरात थांबूया नाहीतर आपण हे संकट पार करू शकणार नाही. अनेक घरी शोकांतिका होत चालल्या आहेत.त्यात अजून भर पडायला नकोय.
Indeed superb song, one of my favorites from coke Studio.. Start to end, this song is melodious and meaningful.. Always tops my playlist...
ReplyDeleteVery well written, and explained..
keep it up..
There are pearls like this scattered across seasons of Coke Studio, especially those in Punjabi and Pashto.
Yes..many gem songs are yet to be discovered from the come studio..
DeleteThank you..😄