साडीचा पदर

मला लहानपणापासून साडीच्या पदराचं जाम Fascination आहे. कुठल्याश्या पुस्तकात आजी आपल्या छोट्या नातीचं तोंड आपल्या पदराने पुसते असं काहीसं वाचलं होतं. तेव्हापासून मला असं पदराला तोंड पुसून घ्यायचं होतं.रुमाल,नॅपकिन, टिश्यू वैगरे फार रुक्ष वाटतात.पदर कसा अगदी आपला,मायेने ओथंबून भरलेला वाटतो. मनात तो पदर कसा असत असेल याच चित्र क्लिअर होतं .सुती,धुवट रंगाचा,आणि स्पर्शाला अतिशय मऊ..😍 लहान असताना आजीने पदराला माझं तोंड पुसल्याचं अंधुक आठवतंय.पण ही आठवण क्लिअर नाहीये.🤔 आमच्या मातोश्रींच्या ओढणीला तोंड पुसल्याचं लक्षात नाहीये. (पण एकदा स्वयंपाकघरातल्या हातपुसण्याला तोंड पुसल्यानंतर धपाटा मिळाला होता हे लख्ख आठवतंय.😂).

 तर परवा मी,अहो आणि रेवा बाहेर आलो होतो.रेवाच्या तोंडाला काहीतरी लागलं.मी पटकन माझ्या स्टोलनी तिचं तोंड पुसलं.अगदी प्रतिक्षिप्त क्रिया असावी.आणि अचानक जाणवलं कि तो पदर माझ्याकडेच होता की ! माझा स्टोल.अगदी तस्साच. सुती,धुवून धुवून रंग फिकट झालेला आणि अतिशय मऊ.मी मात्र इतके दिवस त्या पदराला तोंड पुसून घेणारी अशी स्वतःला बघत होते.पण त्या पदराकडे असलेली माया माझ्याकडेच होती.आणि माझ्याजागी रेवा होती. एक वर्तुळ पूर्ण झालं.❤️ 

आजी /आई साडी नेसणारी असो कि वन पीस घालणारी. मायेचा पदर कोणत्या न कोणत्या रूपात नेहमीच असणार आहे..😍 कारण माया तीच आहे आणि ती कायम राहणार.

Comments

Post a Comment

Popular Posts