Skip to main content

Posts

Featured

छोटा गैरसमज

 आज रेवा आणि बाबाला सुट्टी. आईला आज ऑफिस होतं. आज स्वयंपाकाच्या मावशींनी सुट्टी घेतली आहे. आईने सकाळी पटापट जमेल तेवढा स्वयंपाक केला. मग  आईने लॉगिन केलं. WFH करत असल्यानं  आई   "घर की मुर्गी दाल बराबर" आहे रेवासाठी. बाबा एरवी फक्त शनिवार रविवार वाट्याला येतो. आज  फक्त  रेवा आणि बाबा. आज तर तिच्या साठी तंगडी कबाब फिलिंग आलं असणार. प्रचंड खुष होती. बाबाने आज रेवाला अंघोळ घातली.( रविवारी बाबा रेवाला अंघोळ घालतोच. आज बोनस दिवस) दोघांनी मिळून हार आणले,दरवाजाला लावले. गाड्या धुतल्या, हाराने सजवल्या. तिची छोटी सायकल रेवाने स्वच्छ केली.सायकल हार घालून नटली. बाबाने घर आवरले.खास त्याच्या टचने बारीक सारीक, काना कोपऱ्यातून कचरा, धूळ झाडून घेतली.(१००% स्वच्छ) पूजा वैगरे झाली मग बाबा अजून कामाला लागला. बाबाला पाहून रेवाने तिची छोटी खुर्ची स्वयंपाघरात घेतली आणि बसून घेतलं. रेवा बघत होती. बाबाने डाळ तांदूळ धुवून घेतले.कुकर लावला. एकीकडे सटर फटर भांडी घासून टाकली. बाबाने कणकेचे छोटे गोळे केले. कढई खाली गॅस लावला  आता रेवाचे सवाल चालू झाले. "बाबा तू काय करतोयस, आता तेल का ओतलंस , छोटी पो

Latest Posts

बाळ मोठं होतंय

पत्ता

What really matters

निरागस

भाषा

भांडा -भांड

पालकत्वाची प्रात्यक्षिके

ऑनलाईन शॉपिंग

तू आई आहेस म्हणुनी

निःशब्द